S M L

मुख्यमंत्र्यांची तावडेंना क्लीन चिट, राजीनाम्याचा प्रश्नच नाही !

Sachin Salve | Updated On: Jun 23, 2015 08:47 PM IST

मुख्यमंत्र्यांची तावडेंना क्लीन चिट, राजीनाम्याचा प्रश्नच नाही !

23 जून : बोगस डिग्री प्रकरणी वादात सापडलेले शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पाठराखण केलीये. तावडेंनी डिग्री पूर्ण केली असून त्यांनी कोणतीही माहिती लपवलेली नाही, त्यामुळे राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही अशी क्लीन चिटच मुख्यमंत्र्यांनी तावडेंना दिलीये. तसंच त्या विद्यापीठला मान्यता नाही, हा तावडेंचा दोष नाही अशी बाजूही मुख्यमंत्र्यांना मांडली.

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची पदवी बोगस असल्याची माहिती समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली. तावडेंनी 1880 ला पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठातून अभियांत्रिकी शिक्षणाची पदवी मिळवली. पण, ज्ञानेश्वर विद्यापीठालाच कोणत्याही विद्यापीठाची मान्यता नाही. जर विद्यापीठालाच मान्यता नसेल तर तावडेंची पदवीही बोगसच असल्याचा आरोप झाला. विरोधकांनी तावडेंच्या राजीनाम्याची मागणी केलीये. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तावडेंची जोरदार पाठराखण करत विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय.

विनोद तावडेंनी प्रतिज्ञापत्रात कोणतीही माहिती लपवलेली नाही. त्यांनी जे शिक्षण घेतलं त्याबद्दल स्पष्ट खुलासा केलाय. त्यामुळे त्याचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

तसंच ज्या विद्यापीठाला मान्यता नाही, यात तावडेंचा दोष नाही. मुळात तावडेंनी कोणतीही माहिती लपवलेली नाही. अशा प्रकारे काही विद्यापीठ आहेत,जे रोजगार निर्मिती करतात त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

विशेष म्हणजे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची पदवीही बोगस असल्याचं समोर आलं होतं तेव्हा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी या प्रकरणाची चौकशी करणार असं स्पष्ट केलं होतं. तर मुख्यमंत्र्यांनी लोणीकरांवर प्रतिक्रिया देण्यास टाळलं होतं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 23, 2015 08:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close