S M L

भुजबळ बळीचा बकरा नको -राज ठाकरे

Sachin Salve | Updated On: Jun 23, 2015 10:22 PM IST

raj thakre23 जून :भुजबळांवर कारवाई होते ते बरच आहे पण, अजित पवार आणि सुनील तटकरे यांना वाचवण्यासाठी फक्त भुजबळ बळीचा बकरा नको, असं मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय. राज ठाकरे सध्या कोकण दौर्‍यावर आहेत. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

महाराष्ट्र सदन आणि कलिना भूखंड प्रकरणी छगन भुजबळांवर कारवाई होत आहे त्यात काही दुमत नाही. याअगोदरही आम्ही भुजबळांच्या गैरव्यवहाराबद्दल भूमिका मांडली होती. विधानसभेच्या प्रचाराच्या काळात भुजबळांच्या घोटाळ्याबद्दल तपशील जनतेसमोर सादर केली होती. त्यामुळे आता कारवाई झाली याबद्दल कुणाला दुख असल्याचं कारण नाही असा खोचक टोला राज यांनी लगावला. परंतु, अजित पवार आणि सुनील तटकरेंना सिंचन घोटाळ्यासाठी वाचवू नये असं काही होऊ नये असा संशय राज ठाकरेंनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी शिवसेनेलाही टोला लगावलाय. शिवसेना सत्तेत आहे, तर जैतापूरविरोधात आंदोलन का करते, भूसंपादन झाल्यावर कसला आलाय विरोध, असा टोला राज ठाकरे यांनी लगावलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 23, 2015 08:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close