S M L

शौचालयाच्या खड्ड्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: Jun 24, 2015 11:46 AM IST

शौचालयाच्या खड्ड्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू

24 जून :गडचिरोली जिल्ह्यात अहेरी गावात चार वर्षाच्या मुलाचा शौचालयाच्या खड्‌ड्यात पडून मृत्यू झाला आहे. तब्बल चार महिन्यांपासून हा खड्डा खोदून ठेवण्यात आला होता. परंतु पंचायत समितीकडून अनुदान देण्यात आलं नसल्याने काम सुरू करण्यात आलं नव्हतं. याच खड्‌ड्यात पडून मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. विशेष म्हणजे मंजुरी मिळण्यापुर्वी खड्डा खोदण्याचा आग्रह झाल्याने या चिमुकल्याचा जीव गेलेला आहे.

अहेरी पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या खमनचेरु या गटग्रामपंचायत अंतर्गत येणारे चिंतलपेठ हे लहान गाव आहे. या गावात जानेवारी महिन्यात पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आणि स्थानिक ग्रामसेविका गेले होते, गावकर्‍याची बैठक घेऊन निर्मल ग्राम योजनेअंतर्गत शौचालय बांधकाम सुरू करण्याचा आग्रह केला. शौचालयाचं बांधकाम न झाल्यास शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही असं सांगितल्याने गावातल्या 82 लाभार्थ्यांनी खड्डे खोदले होते. फेब्रुवारीत हे खड्डे खोदण्यात आले होते, पण जून महिना येईपर्यंत हे खड्डे बांधकामासाठी निधी न मिळाल्याने ते तसेच पडून राहीले आणि दुर्देवाने यात चार वर्षाच्या मुलाचा त्या खड्‌ड्यात पडून मृत्यु झाला आहे.

ही बातमी समजल्यानंतर अधिकारी गावात आले असता नागरिकांनी पंचायत समितीच्या निष्काळजीपणाबद्दल रोष व्यक्त केला. शासकिय योजनेत मंजुरी नसताना खड्डे खोदण्याचा आग्रह झाला मात्र निधीसाठी पाठपुरावा न केल्याने ही घटना घडल्याचा आरोप नागरिकानी केला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 24, 2015 09:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close