S M L

विनोद तावडे यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक

Samruddha Bhambure | Updated On: Jun 24, 2015 12:23 PM IST

 विनोद तावडे यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक

24 जून : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अनधिकृत पदवीवरून काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या मुंबईतल्या विलेपार्ले इथल्या घराबाहेर निदर्शने करत राजीनाम्याची मागणी केली आहे.

जितेंद्र तोमर, स्मृती इराणी आणि बबनराव लोणीकरांनंतर आता बोगस पदवी प्रकरणी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. तावडेंनी पुण्यातल्या ज्या ज्ञानेश्वर विद्यापीठातून इंजिनियरिंगची पदवी घेतल्याचा दावा केलाय, त्या विद्यापीठाला शासनाची मान्यताच नसल्याची माहिती पुढे आली आहे.त्यामुळे विनोद तावडे यांची पदवी बनावट असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

याप्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कालच विनोद तावडे यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यायला हवा, असं मत व्यक्त केलं आहे. त्याचपार्श्वभूमीवर काँग्रेसने आज तावडे यांच्या घराबाहेर मोर्चा काढून राजीनामा देण्याची मागणी केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 24, 2015 12:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close