S M L

ताडोबा जंगलात शिकारीवरून दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू ?

Sachin Salve | Updated On: Jun 24, 2015 06:20 PM IST

ताडोबा जंगलात शिकारीवरून दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू ?

24 जून : चंद्रपुरच्या ताडोबा जंगलात एका पट्टेदार वाघाच्या मृत्यूमुळे खळबळ उडालीये. या वाघाच्या मृतदेहाजवळ मृत सांबरही आढळलंय. सांबराच्या शिकारीवरून झालेल्या दोन वाघाच्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जातेय.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये येणार्‍या जामनी बीटमध्ये हा वाघ मृतावस्थेत आढळल्यानंतर ताडोबा प्रकल्पाच्या अधिकार्‍यासह वनविभागाच्या अधिकार्‍यांनी भेट देऊन पाहणी केली. चार वर्षे वयाचा हा वाघ असून त्याच्या शरीरावर हलक्या जखमा आढळल्यात. वाघाच्या मृतदेहाच्या बाजुला सांबराचे मृतदेह असल्याने सांबरावरुन दोन वाघाची झुंज होऊन त्यात या वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. आज या सकाळी वाघ आणि सांबराच शवविच्छेदन करण्यात आलं.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 24, 2015 04:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close