S M L

मुंबईकरांनो सावध राहा, चड्डी-बनियान गँग सक्रीय झाली !

Sachin Salve | Updated On: Jun 24, 2015 10:35 PM IST

मुंबईकरांनो सावध राहा, चड्डी-बनियान गँग सक्रीय झाली !

24 जून : मुंबईच्या उपनगरात चड्डी-बनियान गँग पुन्हा सक्रीय झाल्यामुळे खळबळ उडालीये. ही गँग बोरिवलीमधील एका ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. बोरिवलीत चड्डी-बनियानवर असलेले सात तरुण 15 जूनच्या रात्री चोरीसाठी इमारतीची रेकी करत होते. मात्र, हाती काहीच न लागल्याने ही गँग परतली आणि मोठी घटना टळली.

या टोळीच्या वाढत्या घटना लक्षात घेता उत्तर-प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त फत्तेसिंह पाटील यांनी सीसीटीव्ही दृश्ये सर्व पोलीस स्टेशनमध्ये पाठवलं असून सतर्कतेचे आदेशही देण्यात आले आहेत. पेट्रोलिंगसह रात्री अनेक ठिकाणी नाकाबंदीही वाढवली आहे. काही वर्षांपूर्वी अशाच चड्डी-बनियान गँगने मुंबईत धुमाकूळ घातला होता.

मालाडमध्ये या गँगने पोलिसांवरही हल्ला केला होता. या टोळीकडे शस्त्रं तर आहेतच, शिवाय कोणाच्याही हाती लागू नये म्हणून ही टोळी आपल्या अंगाला तेल लावते. सध्या मुंबईच्या उपनगरात चड्डी-बनियान गँगची दहशत वाढली आहे. कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसरसह नालासोपारा, वसई आणि विरारमध्ये या गँगने खळब माजवली आहे. मुंबईत चाकरमानी रात्री कामावरून घरी येतात, अशा वेळी सक्रीय असलेली ही टोळी समोर आल्यास काय होईल याची कल्पनाच या सीसीटीव्ही दृश्यांमधून करा. त्यामुळे मुंबईकरांनो....सतर्क राहा.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 24, 2015 09:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close