S M L

एसआरपीफ जवानांची उपेक्षा

19 नोव्हेंबर मंुबईच्या गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात सुरक्षेसाठी असणार्‍या एसआरपीएफच्या जवानांना उघड्यावरच झोपावं लागतंय. निवार्‍याची कुठलीही सोय नसल्याने 30 जवानांना थंडीत कुडकुडत झोपावं लागतं. एवढंच नाही तर आंघोळ, जेवण आणि कपडे धुणंही या जवानांना उघड्यावरच करावं लागतं. सुरक्षा जवानांना मंुबईत कशी वागणूक मिळते याचं उदाहरणच यानिमित्तानं पाहायला मिळतंय. ऍडिशिनल पोलीस कमिशनर पद्मनाभन यांनी या जवानांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येईल, असं आश्वासन दिलं आहे. मंुबईवरच्या 26/11च्या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होतं आहे. यानिमित्ताने दहशतवाद्यांचा निधड्या छातीने सामना करणार्‍या शहिदांचं स्मरण केलं जातं आहे. पण खरोखरच सरकार सुरक्षा जवानांची किती काळजी घेतं हेच या उदाहरणावरुन दिसतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2009 10:29 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2009 10:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close