S M L

भारतीय वंशाचे बॉबी जिंदाल अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या रिंगणात

Samruddha Bhambure | Updated On: Jun 25, 2015 12:18 PM IST

भारतीय वंशाचे बॉबी जिंदाल अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या रिंगणात

25 जून : भारतीय वंशाचे बॉबी जिंदाल यांनी 2016 रोजी होणार्‍या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढण्याचं निश्चित केलं आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविणारे जिंदाल हे भारतीय वंशाचे पहिले अमेरिकन आहेत.

अमेरिकेच्या ल्युसियानाचे राज्यपाल बॉबी जिंदाल यांनी रिपब्लिकन पक्षाकडून अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. जिंदाल यांनी 2003 मध्ये पहिल्यांदा ल्युसियानाच्या राज्यपालपदाची निवडणूक लढवली होती. पण काही मतांच्या फरकाने त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर ते दोन वेळा सिनेट सदस्य म्हणून निवडणून आले. 2008 मध्ये अमेरिकेत राज्यपाल बनणारे जिंदाल पहिले भारतीय ठरले. त्यानंतर ते आता अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढायला सज्ज झाले आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 25, 2015 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close