S M L

शिष्यवृत्ती परीक्षा आता पाचवी आणि आठवीमध्ये होणार !

Sachin Salve | Updated On: Jun 25, 2015 07:53 PM IST

शिष्यवृत्ती परीक्षा आता पाचवी आणि आठवीमध्ये होणार !

25 जून : चौथी आणि सातवीमध्ये घेतली जाणारी राज्यातली पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आता पाचवी आणि आठवीमध्ये घेतली जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याबाबत घोषणा केलीये.

शिक्षण हक्क कायद्यातल्या तरतुदी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय. शिक्षण हक्क कायदा (RTE) नुसार प्राथमिक शाळा आता पहिली ते पाचवी, उच्च प्राथमिक 6 वी ते 8 वी आणि माध्यमिक विभाग 9 वी आणि 10 वीचा असणार आहे. त्यानुसार शिष्यवृत्तीची परीक्षा 5 वी व 8 वीमध्ये होणे अपेक्षित आहे. शैक्षणिक वर्ष-2015-16 मध्ये जर ही परीक्षा घेतली तर या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी 4 थी आणि 7 वीची शिष्यवृत्ती परीक्षा यापूर्वी दिली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा यंदा परीक्षा द्यावी लागेल. म्हणून शैक्षणिक वर्ष 2016-17 मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेणे योग्य होईल असं तावडे यांनी सांगितलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 25, 2015 07:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close