S M L

चिक्की घोटाळा : 'ई टेंडरिंग'चा अध्यादेश 2014 ला लागू !

Sachin Salve | Updated On: Jun 26, 2015 03:02 AM IST

चिक्की घोटाळा : 'ई टेंडरिंग'चा अध्यादेश 2014 ला लागू !

25 जून : चिक्की घोटाळ्या प्रकरणी तीन लाखांपेक्षा अधिक रक्कमेची खरेदी करायची असेल तर त्याचं ई टेंडरिंग करावं असा अध्यादेश एप्रिल 2015 काढला असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलाय. पण त्याचा दावा  फोल ठरलाय. हा अध्यादेश 2014 मध्येच काढण्यात आलाय.

ई टेंडरिंग बाबत 26 नोव्हेंबर 2014 सालीच अध्यादेश लागू झालाय. या अध्यादेशानंतर कुठलाही नवीन अध्यादेश काढण्यात आलेला नाही. वा त्याला स्थगिती मिळाला नाही वा त्याला वाढीव मुदतदेखील मिळालेली नाही. त्यामुळे महिला आणि बालकल्याण विभागानं फेब्रुवारी 2015 मध्ये खरेदी केली. त्याला ई टेंडरिंग बंधनकारक आहे हे स्पष्ट होतंय.

त्याचप्रमाणे बचत गटाना कामं देताना तीन लाखांपेक्षा अधिकची काम असतील तर आम्ही ई टेंडरिंगनं करू असं महिला आणि बालकल्याण विभागानं नागपूर खंडपीठाला प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितलं आहे. त्यामुळे बचत गटांना काम द्यायचं असेल तर ई टेंडरिंगचा मुद्दा पुढे केला जातो. आणि ठेकेदारांना काम द्यायचं असेल तर ई टेंडरिंगचा मुद्दा समोर आणला जात नाही हा दुहेरी न्याय का असा प्रश्नही उपस्थित होतोय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 25, 2015 10:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close