S M L

पंकजांवरील आराेप गंभीर; मुख्यमंत्री उत्तर द्यायला सक्षम - उद्धव ठाकरे

Samruddha Bhambure | Updated On: Jun 26, 2015 01:57 PM IST

पंकजांवरील आराेप गंभीर; मुख्यमंत्री उत्तर द्यायला सक्षम -  उद्धव ठाकरे

26 जून : पंकजा मुंडे यांच्यावर करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप गंभीर आहेत. परंतु मंत्र्यांवर झालेल्या आरोपांचे उत्तरदायित्व मुख्यमंत्र्यांकडेच असून ते या आरोपांना उत्तर द्यायला सक्षम आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिली. तसंच सध्या बोगस पदव्यांचा सुळसुळाट झाल्याचेही ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या 'धंदा कसा करावा' या पुस्तकाचं प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं.

या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना, सध्या राजकारणात बोगस पदव्यांचा सुळसुळाट झालं असून नेमकं काय खरं आणि काय खोटंय , तेच समजत नाही. माझे आजोबा प्रबोधनकार आणि वडील बाळासाहेब सहावी पास होते. फी भरायला पैसे नाहीत म्हणून त्यांना अर्धवट शिक्षण सोडावं लागलं पण त्याने त्यांचं काहीच अडलं नाही. मात्र सध्या पदव्यांचा कशासाठी सोस चालला आहे हेच कळत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबईतील नालेसफाइची चौकशी व्हावी, अशी मागणी करणार्‍या भाजपा नेत्यांना कानपिचक्या देत उद्धव ठाकरे यांनी अहमदाबाद शहरात पाऊस पडला. तिकडेही नाले भरले. त्याचीही चौकशी करायला पाहिजे या शब्दात उत्तर दिलं आहे. कोस्टल रोड प्रकल्पाला होणार्‍या विरोधाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, कोळी बांधवांवर अन्याय होणार नाही आणि ते बेघर होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. कोळी बांधवांचे समाधान करूनच कोस्टल रोड पुर्ण करू असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 26, 2015 11:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close