S M L

मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर 'पायल'नं ठोकली धूम

Samruddha Bhambure | Updated On: Jun 26, 2015 02:55 PM IST

मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर 'पायल'नं ठोकली धूम

26 जून : आजपर्यंत लग्नमंडपातून वर किंवा वधू पळाल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील, पण काल (बुधवारी) मुंबईत एका लग्नमंडपातून पायलने धूम ठोकली. होय पायल... आता तुम्ही विचार करत असाल ही पायल कोण? तर पायल हे कुठल्या मुलीचं नाव नसून चक्क एका घोडीचं नाव आहे.

या पायल घोडीने एका मोक्याची क्षणी पळ काढून नवरदेवाला चांगलाच दणका दिला. झाले असे की, वरातीसाठी पायलला सजवून मंडपात आणले गेले. नवरदेव तयार झाला होता आणि काही मिनिटांतच वरात काढण्यासाठी हजर होणार होता. मात्र, त्याचवेळी पायलने लग्नमंडपातून पळ काढत वांद्रे-वरळी सी लिंक गाठला. टोलनाक्यावरचे कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि पोलीस पायलला पाहून अवाक झाले. लग्नमंडपातून पळालेल्या या घोडीला कसे आवरायचे, हा प्रश्न या सगळ्यांना पडला होता. या सगळ्या घटनेची खबर मुंबई पोलीसांच्या कंट्रोल रूमला लागल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सी लिंकवरच्या पायलच्या या अनाहूत एन्ट्रीने तिथले वाहतूक पोलिसही काहीकाळ गोंधळून गेले. अखेर एका कार चालकानेच या घोडीला पकडलं आणि सुरक्षारक्षकांच्या ताब्यात दिलं. सखोल चौकशीनंतर या घोडीचा पुन्हा तिच्या मालकाच्या ताब्यात देण्यात आलं, आणि सी लिंकवरच्या या थरारनाट्याचा अखेर द एंड झाला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 26, 2015 02:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close