S M L

राज पुरोहितांच्या स्टिंगमुळे भाजपमध्ये राजकीय भूकंप

Sachin Salve | Updated On: Jun 26, 2015 07:01 PM IST

राज पुरोहितांच्या स्टिंगमुळे भाजपमध्ये राजकीय भूकंप

26 जून : चिक्की घोटाळा आणि बोगस पदवी प्रकरणामुळे वादात सापडलेल्या भाजप सरकाराला आज आणखी एक मोठा हादरा बसलाय. भाजपचे आमदार राज पुरोहित एका व्हिडिओ स्टिंगमध्ये अडकले असून या स्टिंगमध्ये पुरोहित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून पक्षाला घरचा अहेर दिलाय. मोदींच्या निर्णयामुळे व्यापारी दुखावले गेले आहे असा खुलासाच पुरोहित यांनी केलाय.

त्यानंतर त्यांनी भाजपचे आमदार आणि प्रसिद्ध बिल्डर मंगलप्रभात लोढा यांची पोलखोल केलीये. मंगलप्रभात लोढा यांनी दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा पैसा हडपलाय. महाजनांच्या पैशावर लोढा गब्बर झाले आहे असा गौप्यस्फोट पुरोहित यांनी केलाय. एवढंच नाहीतर लोढांनी निवडणुकीत पैसा ओतला असा सणसणीत आरोपही केलाय.

पक्षात पैसा आणि संघाचीच चलती आहे. मलाही मंत्रिपद हवं होतं पण, असं होऊ शकलं नाही अशी नाराजीही पुरोहितांनी व्यक्त केली. पुरोहित यांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे भाजपमधील यादवी चव्हाट्यावर आलीये. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तातडीने पुरोहितांकडून या स्टिंगबद्दल खुलासा मागितलाय. या व्हिडिओची वैध्यता तपासूनच पुढील कारवाई केली जाईल असंही दानवेंनी आयबीएन लोकमतशी बोलताना स्पष्ट केलं.

 

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 26, 2015 04:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close