S M L

चिक्की घोटाळा : मेडिकल किट खरेदीमध्येही घोळात घोळ !

Sachin Salve | Updated On: Jun 26, 2015 07:39 PM IST

चिक्की घोटाळा : मेडिकल किट खरेदीमध्येही घोळात घोळ !

pankaja munde scam 345526 जून : महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे चिक्की घोटाळ्यामुळे वादात सापडल्या आहेत. पण, आता या चिक्की घोटाळ्या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक तपशील समोर आलीये. अमरावतीमधील मेडिसीन कंपनीला पावणे चार कोटींचे मेडिकल किट तयार करण्यासाठी कंत्राट देण्यात आले. पण, ही कंपनी फक्त मलम आणि कॅप्सूल तयार करते. मग, मेडिकल किटचं कंत्राट कसं देण्यात आलंय असा घोळ समोर आलाय.

पंकजा मुं़डे यांच्या खात्याने अंगणवाड्यांसाठी मेडिकल किट बनवण्यासाठी अमरावतीतील प्रिस्ट फार्मासुटिक्ल या कंपनीला कंत्राट दिलं होतं. या कंपनीत मेडिकल किटमधल्या दोनच गोष्टी तयार होतात. त्यामध्ये केवळ मलम आणि कॅप्सूल आहेत.

मग, या कंपनीला संपूर्ण किट तयार करण्याचं कंत्राट मिळालं कसं हा प्रश्न निर्माण होतोय. महत्वाचं म्हणजे या कंपनीच्या कामगारांनीच पुढं येवून ही बाब सांगितलीये. तसंच या कंपनीने कामगारांचा पगार थकवल्याचा आरोप या कंपनीतल्या कामगारांनी केलाय. विशेष म्हणजे 2013 नंतर मेडिकल किट या अंगणवाडी केंद्रांना पुरविण्यात आल्या नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीये.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 26, 2015 07:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close