S M L

भाजपने मागितलं राज पुरोहितांकडून स्पष्टीकरण

Sachin Salve | Updated On: Jun 26, 2015 09:22 PM IST

भाजपने मागितलं राज पुरोहितांकडून स्पष्टीकरण

26 जून : भाजपचे आमदार राज पुरोहित यांच्या या वक्तव्यांची भाजपच्या नेतृत्वानंही दखल घेतली आहे. राज पुरोहित यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलंय अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. तसंच सीडीपाहून निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

एका स्टिंग ऑपरेशनमध्ये पुरोहित यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलीये. मोदी यांच्या धोरणामुळे व्यापार्‍यांचं नुकसान झालंय अशी टीका केलीये. तसंच दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची संपत्ती मंगलप्रभात लोंढा यांनी लाटली असा आरोपही केलाय. पुरोहितांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे भाजपमध्ये राजकीय भूकंप आलाय. दानवे यांनी स्पष्टीकरण मागितलं आहे. तर व्हिडिओ क्लिपची वैधता तपासली जाणार आहे. आणि पक्ष हे काम करत आहे, त्यानंतरच पुरोहित यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल असं भाजपचे मुंबईचे शहराध्यक्ष आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 26, 2015 09:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close