S M L

दैनिक सामनामधून वाचकांची दिशाभूल

21 नोव्हेंबर सामनामधून पुन्हा एकदा वाचकांची दिशाभूल करण्यात आली आहे. शुक्रवारच्या IBN लोकमतच्या आजचा सवाल या कार्यक्रमात आलेला SMS पोल, सामनाने खोटा छापला आहे. शुक्रवारच्या आजचा सवालचा प्रश्न होता. शिवसैनिकांनी केलेला हल्ला हा विनाशकाले विपरीत बुद्धी आहे का ? आणि 67 टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिल्याचा चुकीचा पोल सामनानं छापला आहे. एकप्रकारे वाचकांची दिशाभूल करण्याचा निर्लज्जपणा सामनाना दाखवला आहे. वास्तविक आयबीनएन लोकमतच्या पोलनुसार 88 टक्के लोकांनी होय असं उत्तर दिलं आहे. तर 12 टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं आहे. ...ते शिवसेनेचे वाघ - सामनाआयबीएन लोकमतच्या विक्रोळी आणि पुण्याच्या कार्यालयावर हल्ला करून पत्रकारितेवर हल्ला करणार्‍या शिवसेनेच्या गुंडांची शिवसेनेनं आजच्या सामना मधून पाठराखण केली आहे. हा हल्ला म्हणजे शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक होता असं म्हणण्यात आलं आहे. शिवसेनेनं केलेल्या या भ्याड हल्ल्याचं शनिवारच्या दैनिक सामनामधून निर्लज्जपणे समर्थन करण्यात आलं आहे. शिवसेनेच्या ह्या गुंडांना वाघ म्हणण्यात आलंय. तर आयबीएन लोकमतच्या पत्रकारितेला मनोविकृत पत्रकारिता म्हटलंय. या वृत्तीच्या विरोधात हा हल्ला होता असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. सामनाच्या या लेखात आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्या बद्दल पत्रकारितेला न शोभणारे अपशब्द वापरण्यात आले आहेत. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर म्हणजे पत्रकारितेवर हल्ला करणार्‍या शिवसेनेने या गुंडांची पाठराखण करण म्हणजे शरमेची गोष्ट आहे. या त्यांच्या कृत्यानंतरही हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या गुंडांची हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशीही केली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2013 04:09 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 21, 2009 11:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close