S M L

पत्रकारांवरील हल्ले अजामीनपात्र करणार - गृहमंत्री

21 नोव्हेंबर पत्रकारांवरील हल्ले हे लवकरात लवकर अजामीनपात्र गुन्हे म्हणून करण्यात येतील असं आश्वासन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलं. तसंच याआधी पत्रकारांवर आणि माध्यमांवर झालेले सर्व हल्ल्याचे खटले हे फास्ट ट्रक कोर्टात चालवण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं. याबाबतीत स्वत: लक्ष घालणा असून हा कायदा लवकरात लवकर करण्याच आश्वासन पाटील यांनी दिलं. ज्या केबल चालकांनी माध्यमांच प्रसारण बंद केल असेल किंवा कोणाच्याही दबावाने बंद केलं असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असंही पाटील म्हणाले. IBN लोकमतवरच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी पत्रकारांनी शनिवारी हुतात्मा चौकात धरणं आंदोलन केलं. या वेळी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी हुतात्मा चौकात येऊन आंदोलक पत्रकारांची भेट घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 21, 2009 11:31 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 21, 2009 11:31 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close