S M L

राज पुरोहित म्हणतात, 'तो' आवाज माझा नाही !

Sachin Salve | Updated On: Jun 27, 2015 02:14 PM IST

raj purohit_bjp_23427 जून : स्टिंग ऑपरेशनमुळे चांगलेच गोत्यात सापडलेले भाजपचे आमदार राज पुरोहित यांनी आता 'तो मी नव्हेच' असा पवित्रा घेतलाय. स्टिंग ऑपरेशन म्हणजे माझ्या विरोधातलं षडयंत्र आहे. त्यात तथ्य नाही, अशी प्रतिक्रिया राज पुरोहित यांनी दिलीये. जी सीडी दाखवली जातेय, त्यातला आवाज माझा नाही. माझ्या स्वच्छ प्रतिमेला आणि नेतृत्वाला यामुळे नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय, असंही ते म्हणालेत. एक पत्रक काढून राज पुरोहित यांनी आपला खुलासानामा जाहीर केलाय.

राज पुरोहित यांचं नेमकं काय म्हणणंय ?

स्टिंग ऑपरेशन म्हणजे माझ्या विरोधातलं षडयंत्र आहे...त्यात तथ्य नाही जी सीडी दाखवली जातेय, त्यातला आवाज माझा नाही. माझ्या स्वच्छ प्रतिमेला आणि नेतृत्वाला यामुळे नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय. मी, माझ्या पक्षाच्या नेतृत्वाचा मनापासून आदर आणि सन्मान करतो. त्यांच्याबद्दल मी कधीच कुठलेही भाष्य करू शकत नाही. आरएसएस माझे पालक आहेत त्यांच्यावर मी टीका करू शकत नाही.

देवेंद्र फडणवीस एक आदर्श मुख्यमंत्री आहे. रावसाहेब दानवे आणि आशिष शेलार यांच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे. राज ठाकरे हे महाराष्ट्राचे आदर्श नेते आहेत. त्यांच्याविरूद्ध मी कसलेही विधान करण्याचे कारण नाही. ही सीडी बोगस आणि काल्पनिक आहे.  माझी प्रतिमा मलिन करण्याचं हे षडयंत्र आहे. मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केलेली आहे. तथाकथित सीडीबाबत फॉरेन्सिक इन्व्हेस्टीगेशन करण्याची मागणी केली आहे.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 27, 2015 02:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close