S M L

गुजरातच्या पावसाचा नंदुरबारला फटका, घरांची पडझड

Sachin Salve | Updated On: Jun 27, 2015 05:20 PM IST

गुजरातच्या पावसाचा नंदुरबारला फटका, घरांची पडझड

27 जून : गुजरातमध्ये सुरू असलेल्या अतीवृष्टी आणि वादळाचा फटका नंदुरबार जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागातल्या सातपुडा पर्वतरांगातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यांना बसला आहे. गुजरातच्या सीमेलगत असल्याने याठिकाणी वादळवार्‍यांसह झालेल्या मुसळधार पावसाने अनेक आदिवासी बाधवांची डोंगरदर्‍यावरची घरे उद्‌ध्वस्त झाली आहेत. तर अनेक घरांचे पत्र आणि कौलही उडून गेली आहेत.

दोन दिवसांपुर्वी झालेल्या या तडाखेदार पावसाने अनेक गाव आणि पाड्यावरचा विद्युत पुरवठा खंडित झाला असून अनेक गाव आणि पाड्यांचा संपर्क तुटला आहे. यासोबतच दुर्गम भागातले प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आश्रमशाळांमध्ये पडझड झाली असून त्याचा फटका रुग्णसेवेला ही बसला आहे.

सोबतच सातपुड्याच्या दुर्गम भागातल्या जंगलातील अनेक वृक्ष उन्मळुन पडली आहे. वीज आणि मोबाईलला कव्हरेज नसल्याने या गाव आणि पाड्याचे हाल अद्यापही प्रशासना पर्यंत पोहचू शकले नसल्याने प्रशासन या सर्वच नुकसानी बाबत अनभिज्ञ असल्याचा प्रकारही समोर आला आहे.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 27, 2015 05:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close