S M L

पंकजा मुंडे छोट्या व्यक्ती, चिक्की घोटाळ्यावर पवारांचं 'नो कमेंट'

Sachin Salve | Updated On: Jun 27, 2015 08:48 PM IST

Sharad Pawar on tobacco27 जून : राज्य सरकारच्या भ्रष्टाचार आणि वाटचालीबद्दल शरद पवार जाहीरपणे बोलतात. मात्र, पंकजा मुंडे यांच्या चिक्की प्रकरणातील आरोप बद्दल बोलण्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टाळलं. पंकजा या छोट्या व्यक्ती आहेत. छोट्या व्यक्तीबद्दल मी काय बोलणार असं पवार म्हणाले. तसंच फडणवीसांना आता कोण सल्ला देणार असा टोलाही पवारांनी लगावला. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत शरद पवारांनी आपल्या स्टाईलने चिक्की घोटाळ्याचा समाचार घेतला. पत्रकारांनी पवारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जेष्ठ म्हणून काय सल्ला द्याल असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले, फडणवीसांना आता कोण सल्ला देणार ?, तुम्हाला इतिहास तर माहितच असेल अशी मिश्किल प्रतिक्रीया पवारांनी दिली. तसंच चिक्की घोटाळ्या प्रकरणी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंच्या खात्यातील गैरव्यवहारावर बोलण्यास पवारांनी टाळलं. पंकजा या छोट्या व्यक्ती आहे त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही. फडणवीस सरकारची जी काही वाटचाल सुरू आहे ती अशीच चालत राहावी. त्यामुळे मीडियाला खाद्यं मिळत राहिलं आणि मीडिया जनतेला बरोबर पुरवेन असा टोलाही पवारांनी लगावला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 27, 2015 05:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close