S M L

मोहोळजवळ सुमो-ट्रकची धडक, 3 भाविक ठार

Sachin Salve | Updated On: Jun 27, 2015 07:33 PM IST

मोहोळजवळ सुमो-ट्रकची धडक, 3 भाविक ठार

mohal accident27 जून : पंढरपूरहून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या भाविकांचा मोहोळजवळ टाटा सुमो आणि ट्रकचा समोरासमोर धडक झालीये. या अपघातात 3 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहे.

या अपघातात वाहनचालक लक्ष्मण सुरेश पाटील, छाया शिवाजी पाटील, सुजाता डवर या तिघांचा जागीच मृत्यू झालाय.

हे सर्व भाविक कोल्हापुरातील कंतेवाडी गावचे राहणारे आहेत. पहाटेच्या सुमारास विठ्ठलाचे दर्शन घेऊन सोलापूर मार्गे अक्कलकोट आणि तुळजापुरला देव दर्शनासाठी जात असताना मोहोळजवळील तांबोळी फाट्याजवळ टाटा सुमो आणि ट्रकचा समोरासमोर जोरदार धडक झाली.

ही धडक एवढी भीषण होती या अपघाता सुमोचा चुराडा झाला. जखमींना सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलंय.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 27, 2015 07:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close