S M L

नालेसफाई कंत्राटदारांविरोधात सोमैय्यांची पोलिसांत तक्रार

Sachin Salve | Updated On: Jun 27, 2015 08:58 PM IST

नालेसफाई कंत्राटदारांविरोधात सोमैय्यांची पोलिसांत तक्रार

27 जून : पहिल्याच पावसात मुंबई तुंबण्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेत नालेसफाईवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहे. आज मात्र भाजपने एक पाऊल पुढे टाकलं. भाजपचे खासदार किरीट सौमय्यांनी याबाबत कंत्राटदारांच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल केलीये.

किरीट सोमैय्यांनी मुंबई महापालिका कंत्राटदारांविरूद्ध मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. नालेसफाईत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप किरीट सोमैय्यानी केला असून त्याच्या चौकशीची मागणी केली आहे. तसंच कंत्राटदारांची सिंडीकेट प्रशासनासोबत बसून संगनमताने मुंबईकरांच्या जीवाशी खेळत असल्याचा टोला सोमैय्यांनी मित्र पक्षाला लगावला आहे.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 27, 2015 08:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close