S M L

चर्चगेट रेल्वेस्थानकात लोकल फलाटाला धडकली, 5 जखमी

Samruddha Bhambure | Updated On: Jun 28, 2015 01:36 PM IST

चर्चगेट रेल्वेस्थानकात लोकल फलाटाला धडकली, 5 जखमी

28 जून : चर्चगेट रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक ३ वर दुपारी सव्वाबाराच्या सुमारास शटींगच्या वेळी लोकल फलाटाला धडकली. ही धडक इतकी जोरात होती की लोकल फलाटावर चढली. या अपघातामुळे प्रवाशांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण होते. लोकलचे मोठे नुकसान झाले असून मोटरमनसह पाच जणं जखमी झाले आहेत.

रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीनं हा अपघात अतिशय गंभीर आहे. याचं कारण म्हणजे लोलकचा वेग जरी कमी असला, तरी स्टेशनवरच्या लोकांना ती जाऊन धडकली असती, किंवा त्यांच्यावर चढली असती तर जीवितहानी होण्याची दाट शक्यता होती. पश्चिम रेल्वेकडून अजून अधिक़ृत निवेदन आलेलं नाही, आम्ही पीआरओंना फोन केला असता त्यांनी यावर आमचे वरिष्ठ अधिकारीच बोलतील, असं उत्तर त्यांनी दिलं.

दरम्यान, या घटनेमुळे पश्चिम रेल्वेमार्गावरील संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे. चर्चेगेटहून सुटणार्‍या सर्व लोकलवर या अपघाताचा परिणाम झाला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2015 01:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close