S M L

मातीमिश्रीत चिक्कीची तपासणी करा- अण्णा हजारे

Samruddha Bhambure | Updated On: Jun 28, 2015 08:52 PM IST

ANNA HAZARE SCORPIO

28 जून : मातीमिश्रीत चिक्कीवरून राज्यात गदारोळ उडाला असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी राज्य सरकारला चांगलाच टोमना मारला आहे. चिक्कीमध्ये भेसळ आढळल्यास चिक्की ठेकेदारांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी केली आहे.

चिक्कीची प्रयोगशाळेत तपासणी करुन चिक्कीत भ्रष्टाचार झालाय का?, चिक्की सरकारला चिकटली का, हे पहावं लागेल, असा चिमटा अण्णांनी काढलाय. हा हजारो बालकांच्या आरोग्यचा प्रश्न आहे. त्यामुळं काँग्रेस- भाजपने एकमेकांवर आरोपबाजी न करता प्रयोगशाळेत चिक्कीची तपासणी करावी आणि चिक्कीत भेसळ असल्यास ठेकेदाराला जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी अण्णांनी केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2015 08:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close