S M L

अकोल्यात जावयाने केलं सासुरवाडीत हत्याकांड

Samruddha Bhambure | Updated On: Jun 28, 2015 09:17 PM IST

crime scene28 जून : अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातल्या मालपुरा गावात हत्याकांड घडलं आहे. चर्‍हाटे कुटुंबावर त्यांच्याच जावयाने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात चार पुरुषांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी दोन तासांच्या आता आरोपींना जेरबंद केलं आहे.

संपत्तीच्या वादातून चर्‍हाटे कुटुंबावर त्यांच्या जावयाने हा प्राणघातक हल्ला केला. चार आरोपींची चौकशी सुरु असून परिसरात तणावाचं वातावरण असल्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

हल्ल्यामध्ये धनराज चर्‍हाटे, शुभम चर्‍हाटे, गौरव चर्‍हाटे, बाबुराव चर्‍हाटे यांचा मृत्यू झाला आहे. धनराज चर्‍हाटे हे पोलिस शिपाई होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2015 09:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close