S M L

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमेरिकेच्या दौर्‍यावर

Samruddha Bhambure | Updated On: Jun 29, 2015 02:32 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमेरिकेच्या दौर्‍यावर

29 जून : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्याचे शिष्टमंडळ एक आठवड्याच्या अमेरिकेच्या दौर्‍यासाठी आज (सोमवारी) पहाटे रवाना झाले. या दौर्‍यात राज्याचे शिष्टमंडळ विविध प्रमुख उद्योग समुहांशी चर्चा करणार आहे.

मुख्यमंत्र्यांसह या शिष्टमंडळात उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, उद्योग विभागाचे विकास आयुक्त सुरेंद्रकुमार बागडे यांचा समावेश आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटीलही या दौर्‍यात सहभागी होणार आहेत.

या दौर्‍यादरम्यान मुख्यमंत्री अमेरिकेतील विविध प्रमुख उद्योग समुहांशी चर्चा करणार आहेत. त्यात मायक्रोसॉफ्ट, जनरल मोटर्स, बोईंग, क्रिसलर, आयएसई, ऍपल, गुगल, सॅनडिक्स, ऍमेझॉन, ब्लॅकस्टोन, बँक ऑफ अमेरिका, सिसको, इत्यादी बड्या कंपन्यांच्या प्रमुखांशी भेटून मुख्यमंत्री त्यांना राज्यात गुंतवणूक करण्याचं आवाहन करणार आहेत. कोकाकोला या उद्योग समुहासोबतच्या राज्याच्या सामंजस्य करारावरही स्वाक्षर्‍या होणार आहेत. यासोबतच बोईंग, जनरल मोटर्स आदी उद्योग समुहांच्या प्रकल्पांनाही शिष्टमंडळ भेटी देणार आहे.

दौर्‍याच्या प्रारंभी फडणवीस न्यू जसच्च्या गव्हर्नरांसोबत भेट होणार आहे. न्यूयॉर्क, डेट्रॉईट आणि सॅनफ्रान्सिस्को इथे होणार्‍या व्यापार आणि गुंतवणूक विषयक परिषदेत फडणवीस मार्गदर्शन करतील. लॉस एंजेलिसमध्ये अमेरिका आणि कॅनडातील बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित 17व्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान फडणवीस भूषवणार आहेत. या अधिवेशनात अमेरिका व कॅनडातील चार हजारांहून अधिक मराठी बांधव सहभागी होणार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 29, 2015 02:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close