S M L

झिम्बाब्वे दौर्‍यासाठी अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व, टीममध्ये मोठे बदल

Samruddha Bhambure | Updated On: Jun 29, 2015 06:25 PM IST

झिम्बाब्वे दौर्‍यासाठी अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व, टीममध्ये मोठे बदल

29 जून : झिम्बाब्वे दौर्‍यासाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा मुंबईचा धडाकेबाज फलंदाज अजिंक्य रहाणे याच्याकडे सोपविण्यात आली असून फिरकीपटू हरभजन सिंगने कसोटीपाठोपाठ वन-डे संघातही पुनरागमन केले आहे. याबाबत बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

झिम्बाब्वे दौर्‍यात अपेक्षेप्रमाणे वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, शिखर धवन, सुरेश रैना, रोहित शर्मा, उमेश यादव झिंबाब्वे दौर्‍यावर जाणार नाहीत. त्यांच्याऐवजी नव्या दमाच्या खेळाडूंना संघात संधी मिळाली आहे. हरभजनला तब्बल चार वर्षानंतर वन-डे संघात स्थान मिळाले आहे. 2011 मध्ये हरभजन शेवटची वन-डे खेळला होता.

दरम्यान, येत्या 10 जुलैपासून 'टीम इंडिया' झिम्बाब्वे दौर्‍यावर जाणार आहे. या दौर्‍यात भारतीय संघ तीन वन डे आणि 2 टी-20 सामना खेळणार आहे.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 29, 2015 06:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close