S M L

विनोद तावडे पुन्हा वादात, 191 कोटींचं कंत्राट दिल्याचा आरोप

Sachin Salve | Updated On: Jun 30, 2015 03:05 PM IST

विनोद तावडे पुन्हा वादात, 191 कोटींचं कंत्राट दिल्याचा आरोप

30 जून : शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे बोगस पदवी प्रकरणातून अजून बाहेर पडले नाही तेच आणखी एका वादात सापडले आहे.  विनोद तावडेंवर आता कंत्राट देण्यात अनियमितता केल्याचा आरोप करण्यात आलाय. नियमांचं पालन न करता 191 कोटींचं कंत्राट दिल्याचा गंभीर आरोप तावडेंवर करण्यात आलाय.

चिक्की घोटाळ्यात महिला आणि बालकल्याण मंत्रू पंकजा मुंडे यांनी ज्या प्रमाणे ई टेंडरिंग न करताच कंत्राट दिलं. तोच कित्ता तावडेंनी गिरवलाय. 11 फेब्रुवारी 2015 रोजी शिक्षण विभागानं जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी अग्निशमन यंत्र देण्याचं कंत्राट काढण्यात आलं होतं. मात्र, या कंत्राटावर अर्थखात्यानं आक्षेप घेतलाय. त्यामुळे तावडेंनी घेतलेला निर्णय तुर्तास स्थगित करण्यात आलाय.

मात्र, हे कंत्राट देण्याचा निर्णय आधीच्या सरकारने घेतला होता. त्यावेळी तत्कालिन मंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिली होती मंजुरी असं स्पष्टीकरण विनोद तावडे यांनी दिलंय. मात्र, आघाडी सरकारने जर कंत्राट दिलं होतं तर त्याची अंमलबजावणी आता का करण्यात आली असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काय आहे हे कंत्राट?

- राज्यातल्या 62,105 जिल्हा परिषदांना अग्निशमन यंत्र पुरवण्याचं कंत्राट

- 11 फेब्रुवारी 2015 रोजी शिक्षण विभागानं आदेश काढला

- एक अग्निशमन यंत्र 8,321 रुपयांना खरेदी करण्यात येणार होतं

- आदेशानुसार प्राथमिक शिक्षण संचालकांनी 27 फेब्रुवारी रोजी कंत्राट काढलं

- ठाण्यातल्या रिलायबल फायर इंजिनिअर्सला हे कंत्राट बहाल केलं

 

अर्थखात्याचे आक्षेप

- हे कंत्राट देताना अर्थखात्याची परवानगी घेण्यात आली नव्हती

- कंत्राटदारानं 6 कोटी 20 लाखानं किंमत वाढवली

- 19 कोटींच्या खर्चाची परवानगी असताना 191 कोटींचं कंत्राट दिलं

- संबंधित कंत्राटदाराचा सरकारच्या रेट कॉन्ट्रॅक्ट यादीत समावेश नाही

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 30, 2015 10:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close