S M L

आजचा दिवस एक सेकंदानं मोठा

Sachin Salve | Updated On: Jun 30, 2015 12:56 PM IST

आजचा दिवस एक सेकंदानं मोठा

30 जून : आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा थोडा वेगळा आहे, आजचा दिवस एक सेकंदानी मोठा आहे. नासाच्या माहितीनुसार आज 30 जून हा दिवस सामान्य दिवसांपेक्षा एका सेकंदानी जास्त असेल.

नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरच्या माहितीनुसार पृथ्वीची भ्रमणगती थोडी मंदावली आहे. यामुळे एका सेकंदानी फरक पडेल. या एका सेकंदाला लीप सेकंदामध्ये मोजलं जाणार आहे. एक दिवसात 86 हजार 400 सेकंद असतात. 30 जूनला 11 वाजून 59 मिनिट 59 सेकंद युटीसीवर हे एक सेकंद जोडले जाणार आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार एक सेकंदानी दिवस मोठा असल्याने संगणकांना नुकसान होण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 30, 2015 12:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close