S M L

आयएनएस विक्रांतचे उभारणार धातूशिल्परुपी स्मारक

Sachin Salve | Updated On: Jun 30, 2015 03:18 PM IST

आयएनएस विक्रांतचे उभारणार धातूशिल्परुपी स्मारक

30 जून : भारताची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत अखेरीस भंगारात निघाली. पण, या ऐतिहासिक युद्धनौकेचा इतिहास कायम राहावा यासाठी विक्रांतचे धातूशिल्प उभारण्यात येणार आहे. नौदल मुख्यालयाजवळ वाहतूक बेटावर विक्रांतचे धातूशिल्परुपी स्मारक उभारण्यात येणार आहे.

विक्रांत वरील सामुग्रीचं दक्षिण मुंबईत नौदलाच्या मुख्यालयाजवळ लायन गेटसमोरील वाहतूक बेटावर धातूरुपी स्मारक उभारण्यास महानगरपालिकेच्या गटनेत्यांनी मंजुरी दिली आहे.

आयएनएस विक्रांत ही युद्धनौका मोडीत निघाली असली तरीही युद्धनौकेवरची दोन टन सामुग्री नौदलाकडून सेवानिवृत्त कमांडर एम भादा यांनी विकत घेतली आहे. नामवंत धातू शिल्पकार अर्झान खंबाटा यांच्या सहकार्याने हे स्मारक उभारण्याचा मानस आहे. या स्मारकाचा खर्च एसआरए तत्वाच्या प्रायोजकत्वातून भागवण्याचं भादा यांनी निश्चित केलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 30, 2015 01:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close