S M L

मुंबईतून 151 किलो ‘एमडी’ ड्रग्ज जप्त

Samruddha Bhambure | Updated On: Jun 30, 2015 05:42 PM IST

Drugs nn

30 जून :  मुंबईतील पश्चिम उपनगरत ओशिवरा भागातल्या एका घरातून 151 किलो 'एमडी' ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या एम डी ड्रग्जची किंमत 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. एटीएसला या संदर्भातील माहिती मिळताच त्यांनी ही कारवाई केली. या कारवाईत चार जणांना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार जणांनी मिळून ओशिवरा भागातल्या एका फ्लॅटमध्ये कच्चा माल आणायचे आणि त्यांच्यावर प्रक्रिया करून ड्रग्ज मोठ्या पब्जना पुरवायचे. याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी याकडे लक्ष ठेवून कारवाई केली. हाती लागलेल्या चारही जणांची चौकशी करून यात आणखी कोण सहभागी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 30, 2015 05:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close