S M L

मुख्यमंत्र्यांच्या सचिवामुळे विमान तासभर रखडलं

Samruddha Bhambure | Updated On: Jun 30, 2015 10:39 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या सचिवामुळे विमान तासभर रखडलं

30 जून :  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल (सोमवारी) पहाटे अमेरिकेला रवाना झाले. महत्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री ज्या विमानाने अमेरिकेला गेले त्या विमानाने सुमारे तासभर उशिराने उड्डाण केले. अर्थात हा उशीर झाला तो खुद्द मुख्यमंत्र्यांच्या सचिवांच्या हलगर्जीपणामुळे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री काल (सोमवारी) पहाटे दीड वाजता एअर इंडियाच्या विमानाने अमेरिकेला जाणार होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सचिव प्रवीण परदेशी देखील होते. मात्र, चेक इन करताना सचिवांना ते आपला नवा पासपोर्ट घरीच विसल्याचे लक्षात आले. त्यामुळे घरी जाऊन तो पासपोर्ट आणण्यासाठी त्यांना सुमारे तासभर लागला. यामुळे विमानाला उड्डाण भरण्यासाठीही तासभर उशिर झाला. यामुळे अन्य 150 प्रवाशांना बराच वेळ ताटकळत बसावे लागले होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 30, 2015 09:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close