S M L

पंकजा आणि तावडेंनी राजीनामा द्यावा - अरविंद सावंत

Samruddha Bhambure | Updated On: Jun 30, 2015 10:20 PM IST

arvind ssdsawant30 जून :  काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत असतानाच, आता सत्ताधारी पक्षातील शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा असं पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

पंकजा मुंडे आणि विनोद तावडे या दोंन्ही नेत्यांनी निर्दोष असल्याचा पुरावा येईपर्यंत राजीनामा द्यायला हवा असं मत अरविंद सावंत यांनी व्यक्त केला आहे. बाळासाहेब असते तर त्यांनी आधी पुरावे मागितले असते  आणि प्रथमदर्शनी काही चुकीचं आढळलं असतं तर त्यांनी त्या मंत्र्याला राजीनामा द्यायला सांगितला असता, असंही ते म्हणाले. त्यामुळे पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांनी राजीनामे देऊन चैकशीला समोर जावं असं मत पीटीआयला दिलेल्या मुलाखातीत शिवसेना खासदार अरविंद सावंत व्यक्त केलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 30, 2015 10:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close