S M L

जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

Sachin Salve | Updated On: Jul 1, 2015 01:59 PM IST

kokan rain_mansoon

01 जुलै : यावर्षी देशभरात जून महिन्यांत 16 टक्के जास्त पाऊस झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. मात्र, जुलै आणि ऑगस्टमध्ये नेहमीच्या पावसापेक्षा कमी पाऊस पडेल अशी माहितीही हवामान खात्याने दिलीये.

बिहार आणि दक्षिणेकडच्या काही भागांत जून महिन्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय. देशाच्या मध्य आणि वायव्य प्रांतात चांगला पाऊस झालाय. गेल्या वर्षी जूनमध्ये कमी पाऊस झाला होता, पण नंतर त्याचं प्रमाण वाढलं होतं. पण, यंदाच्या वर्षी वेगळं चित्र निर्माण झालंय. महाराष्ट्रात जूनमध्ये मुंबई, कोकण आणि विदर्भ वगळता इतर भागात कमी पाऊस पडलाय. मराठवाड्यात कित्येक जिल्ह्यात कमी पावसामुळे बळीराजा चिंतेत आहे. बीड, परभणी, उस्मानाबादमध्ये पावसाने सपेशल दडी मारलीये. त्यामुळे पिकांना तांब्या-तांब्याने पाणी द्यावं लागत आहे. पिकं वाचवण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू आहे. अशातच जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाच्या शक्यतेमुळे बळीराजाच्या अडचणीत आणखी भर घालणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 1, 2015 01:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close