S M L

राजीनामा द्या, नाहीतर अधिवेशन होऊ देणार नाही - काँग्रेस

Samruddha Bhambure | Updated On: Jul 1, 2015 06:28 PM IST

राजीनामा द्या, नाहीतर अधिवेशन होऊ देणार नाही - काँग्रेस

01 जुलै : महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे आणि शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत द्यावा,आम्ही पावसाळी अधिवेशनाचं कामकाज होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसनं दिलाय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपच्या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे.

चिक्की घोटाळ्यावरुन आरोप झाल्यानंतर आज महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी माध्यमांना आरोपाबाबत स्पष्टीकरण दिलं. पण पंकजा मुंडे यांचा खुलासा हास्यास्पद आहे असं म्हणत त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे.

अंगणवाडीसाठी चिक्की खरेदीमध्ये महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर 206 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.तर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर 191 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचे आरोप होत आहेत.

दरम्यान, पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण म्हणजे त्यांचा खोटेपणा झाकण्याचा प्रयत्न होता, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. तर लोणावळ्याच्या चिक्कीपेक्षा घोटाळ्याची चिक्की जास्त गाजली असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्याक्ष अशोक चव्हाण यांनी पंकजा मुंडे टोला लगावला. तसंच या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मगणीही त्यांनी केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 1, 2015 06:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close