S M L

अखेर विद्यार्थी जिंकले, आजपासून पाचही मॉडेल स्कूल सुरू

Sachin Salve | Updated On: Jul 2, 2015 09:04 AM IST

अखेर विद्यार्थी जिंकले, आजपासून पाचही मॉडेल स्कूल सुरू

02 जुलै : गडचिरोलीमध्ये पाच मॉडेल स्कूल सुरू ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आलंय. या शाळा आजपासून सुरू होणार आहेत. त्यांचा खर्च राज्य सरकार करणार आहे, गडचिरोलीचे पालकमंत्री अंबरीशराव अत्राम यांनी ही घोषणा केली. मात्र, नवीन विद्यार्थ्याना या शाळांमध्ये प्रवेश मिळणार नाही. आयबीएन लोकमतच्या पाठपुराव्याला यश आलं आहे.

या शाळा सुरू व्हाव्यात यासाठी पाऊस वार्‍याची याची पर्वा न करता 25 मुलं आणि 30 मुली उपोषणावर बसले होते. आलापल्ली ,भामरागड, सिरोंचा, मोहाली आणि एटापल्ली इथल्या मॉडेल स्कुल राज्य सरकारने या वर्षीपासून बंद केल्या होत्या. त्यामुळे गेली तीन वर्ष इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणार्‍या या विद्यार्थ्यांची अडचण झाली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 2, 2015 09:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close