S M L

बाळासाहेबांचा 23 फुटी पूर्णाकृती पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात

Sachin Salve | Updated On: Jul 3, 2015 11:41 AM IST

  बाळासाहेबांचा 23 फुटी पूर्णाकृती पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात

03 जुलै : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची चर्चा सुरू आहे. पण, आता बाळासाहेबांचा 23 फुटांचा पूर्णाकृती पुतळा लवकरच उभारला जाणार आहे. या पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय. ब्रांझच्या या 23 फुटी पूर्णाकृती पुतळ्याचं काम ताडदेव इथंल्या एका कार्यशाळेत काम सुरू आहे.

या पुतळ्याची पाहणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच केली . सध्या पुतळ्याच्या पॉलिशिंगचं काम सुरु असून अंतिम कामासाठी पुतळा कोल्हापूरला पाठवण्यात येईल. शिल्पकार यावलकर हा पुतळा साकारतायत. पण, हा पुतळा मुंबईत कुठे उभारणार याबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे.

Follow @ibnlokmattv

-

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 3, 2015 11:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close