S M L

ढोरे कुटुंबीयांना महेश मांजरेकरांचा मदतीचा हात, दरमहा 10 हजार रुपये दिली मदत

Sachin Salve | Updated On: Jul 3, 2015 04:11 PM IST

ढोरे कुटुंबीयांना महेश मांजरेकरांचा मदतीचा हात, दरमहा 10 हजार रुपये दिली मदत

03 जुलै : मुंबई पोलिसांत 22 वर्ष काम करणारे देवराव ढोरे कुटुंबीयांवर प्रशासनाच्या असंवेनशीलपणामुळे उपासमारीची वेळ आलीये. आयबीएन लोकमतने या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर मदतीचा ओघ सुरू झालाय. सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर ढोरे कुटुंबीयाच्या मदतीला धावून आले आहेत. ढोरे कुटुंबीयांना दर महिन्याला 10 हजार रुपये 'मिक्टा'कडून देण्यात येतील, असं मांजरेकरांनी जाहीर केलंय.

मुंबई पोलीस दलात काम करणारे देवराव ढोरे मुंबई पोलीस दलातील 22 वर्षांच्या सेवेनंतरही आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलीये. 28 मार्च 2012 रोजी कामावरुन परतत असताना काँन्स्टेबल ढोरे एका रेल्वे अपघातात गंभीर जखमी झाले. या अपघातामध्ये डोक्याला जबर मार लागल्यानं देवराम ढोरे यांची सध्याची अवस्था मरणापेक्षाही वाईट झालीये. अशा अवस्थेत ढोरेंची दृष्टीही गेली आहे.

त्यामुळं त्यांना कामावर गैरहजर राहण्याचा दाखला देत मुंबई पोलिसांनी त्यांना रुग्णता सेवानिवृत्त केलंय. मात्र, पोलीस प्रशासनाच्या या आडमुठ्‌या धोरणामुळे ढोरे यांना मिळणारा पगार जानेवारी महिन्यापासून बंद करण्यात आलाय. याबरोबर निवृत्तीनंतर मिळणारी ग्रॅच्युटीमधूनच पोलीस दलाचं झालेलं नुकसानही भरुन काढण्यात येणार आहे. त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलीये. आयबीएन लोकमतने या बहादूर पोलिसाची व्यथा जगसमोर मांडलीय. त्यानंतर आता देवराव ढोरे यांना समाजातून मदत मिळू लागलीय, पण सरकारला जाग कधी येणार, हा खरा प्रश्न आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 3, 2015 12:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close