S M L

फ्रान्सिलाच्या हत्येचं गुढ उकललं, काकानेच केली हत्या

Samruddha Bhambure | Updated On: Jul 3, 2015 03:31 PM IST

 फ्रान्सिलाच्या हत्येचं गुढ उकललं, काकानेच केली हत्या

03 जुलै : नवी मुंबईच्या ऐरोलीमधून काही दिवसांपूर्वी अचानत बेपत्ता झालेल्या फ्रान्सिला फ्रॉन्सिको या 8 वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली असून, पोलिसांना आज (शुक्रवारी) सकाळी मीरारोड-घोडबंदर परिसरात तिचा मृतदेह सापडला. या प्रकरणी फ्रान्सिलाच्या काकाला म्हणजेच मावशीचा नवर्‍याला अटक केली आहे.

फ्रान्सिला फ्रॉन्सिको ऐरोलीच्या सेक्टर 8 मधल्या एकविरा दर्शन सोसायटीत राहत होती. सोमवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घराजवळून बेपत्ता झाली. तेव्हापासून पोलीस तिचा शोध घेत होते. नेहमी सेक्टर 19 मधल्या न्यू हॉरायझन शाळेतून संध्याकाळी सव्वासहा वाजता घरी परतणारी फ्रान्सिला सोमवारी रात्री उशिरापर्यंत न परतल्याने तिच्या नातेवाईकांनी तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांकडून तिचा तपास घ्याला सुरुवात करण्यात आली.

तिच्या मावशीच्या नवर्‍याने कौटुंबिक वादातून गळा दाबून फ्रान्सिलाची हत्या केल्याचं समजतंय. तिच्या शरीरावर जखमेच्या खुणा दिसून आले आहेत. दरम्यान, तिच्या हत्येनंतर ऐरोलीत आणि परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 3, 2015 03:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close