S M L

आज राज्यभरात शाळाबाह्य मुलांचं सर्व्हेक्षण

Sachin Salve | Updated On: Jul 4, 2015 07:23 PM IST

आज राज्यभरात शाळाबाह्य मुलांचं सर्व्हेक्षण

school survey04 जुलै : आज राज्यभर शाळाबाह्य मुलांचं सर्व्हेक्षण होणार आहे. जी मुलं शाळेत जात नाहीत, ती किती आहेत, ती शाळेत का जात नाहीत जर मध्येच शाळा सोडली असेल तर का सोडली ?, या मुद्द्यांचं सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.

या कामासाठीही शिक्षकांना जुपलं गेलंय. प्रत्यक्ष शिक्षकाला जवळपास 100 घरं देण्यात आली आहेत. पण, हे काम एकाच दिवसात होणारं नाहीये. काही पालकांना जर अनेक प्रश्न विचारावे लागले, तर त्याला वेळ लागेल, आणि मग एका दिवसात हे कसं पूर्ण करायचं, हा प्रश्न शिक्षकांपुढे आहे.

औरंगाबादमध्येही वेगवेगळे ठिकाणी मुलांचं सर्व्हेक्षण केलं जातंय. तसंच मुलांना शाळेत न पाठवण्याची कारणं, कुटुंबाची एकंदर परिस्थिती आदी बाबींची चौकशी करून संबंधित मुलांच्या पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवावं असं आवाहन केलं जातंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 4, 2015 01:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close