S M L

होय, दाऊदच्या शरणागतीचा प्रस्ताव फेटाळला, शरद पवारांनी केलं मान्य

Sachin Salve | Updated On: Jul 4, 2015 09:39 PM IST

pawar_on_bjp_news04 जुलै : राम जेठमलानी यांनी दाऊदच्या शरणागतीचा प्रस्ताव दिला होता हे खरं आहे अशी स्पष्ट कबुली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलीये. पण, दाऊदने शरणागती आल्यावर अटक करू नये, घरात नजरकैद ठेवावे अशा अटी टाकल्या होत्या त्या मान्य करणं अशक्य होतं म्हणून प्रस्ताव मान्य केला नाही असं स्पष्टीकरणही शरद पवारांनी दिलं.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी कायदेशीर कारवाई न करण्याच्या अटींवर दाऊदने शरणागतीचा प्रस्ताव ठेवला होता असा गौप्यस्फोट राम जेठमलानींनी मध्यंतरी केला होता. त्यानंतर शरद पवारांनी आज दाऊदच्या शरणागती प्रस्तावाला दुजोरा दिलाय. होय मला त्यावेळी जेठमलानींचा फोन आला होता पण दाऊदची कारवाई न करण्याची अट मान्य न नसल्यानेच आम्ही त्याच्या शरणागतीचा प्रस्ताव फेटाळला, असं स्पष्टीकरण पवारांनी दिलंय. दाऊदने मुंबईत आल्यावर अटक करू नये, घरात नजरकैद करावे अशा अटी टाकल्या होत्या. ज्या माणसावर इतके गंभीर गुन्हे दाखल आहे असा माणसाला अटक का करू नये ?, अटक न करणे हे कसं शक्य आहे. त्यामुळेच प्रस्ताव नाकारला होता आणि तो जेठमलानी यांनीही स्विकारला होता असा खुलासाही शरद पवार यांनी केलाय.

आयबीएन लोकमतचे सवाल

1. दाऊद शरण येणार होता, ही माहिती आजपर्यंत पवारांनी जनतेपासून का दडवून ठेवली?

2. दाऊदच्या शरणागतीचा प्रस्ताव इतकी वर्षं दडपून का ठेवण्यात आला?

3. दाऊदच्या शर्ती मान्य नव्हत्या, म्हणून प्रस्ताव फेटाळला, हा दावा सहजासहजी पटण्यासारखा आहे का?

4. दाऊदचा शरणागती प्रस्ताव फेटाळून, त्याच्या अटकेची संधी गमावलीय का ?

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 4, 2015 09:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close