S M L

मुंबई मेट्रोचा मेगाब्लॉक! चारपर्यंत मेट्रो बंद

Samruddha Bhambure | Updated On: Jul 5, 2015 12:02 PM IST

mumbai_metro_2_jpg_1444852g

05 जुलै : मुंबई मेट्रोच्या वतीने आज (रविवारी) पहिला मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. सकाळी साडे आठ ते दुपारी चार दरम्यान हा मेगाब्लॉक असणार आहे.

घाटकोपर ते वर्सोवा या मुंबई मेट्रो 1 मार्गाची सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी केली जाणार आहे. त्यासाठी मेट्रोची सेवा तब्बल साडेसात तास पूर्णपणे बंद असणार आहे. मेट्रो प्रशासनानं याबाबतची माहिती दिली आहे.

यापूर्वी मेट्रोने डागडुजीसाठी आपला पहिला मेगाब्लॉक आठ महिन्यांनी म्हणजे 24 ते 26 जानेवारी या तीन दिवसांत, पहिल्या दोन तासांसाठी घेतला होता. त्यानंतरही मेट्रोने अनेक महिन्यांनी दुसरा मेगाब्लॉक असाच दोन-तीन तासांसाठी घेतला होता. मात्र आज मेट्रो तब्बल साडे सात तासांसाठी ब्लॉक असणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 5, 2015 11:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close