S M L

ग्रीसचं पुढे काय होणार ?, सार्वमत निकालाचे 11 मुद्दे

Sachin Salve | Updated On: Jul 6, 2015 07:58 PM IST

ग्रीसचं पुढे काय होणार ?, सार्वमत निकालाचे 11 मुद्दे

06 जुलै : ग्रीसमध्ये झालेल्या ऐतिहासिक सार्वमतामध्ये 61 टक्के लोकांनी बेलआऊट पॅकेज स्वीकारायला नकार दिलाय. बेलआऊट पॅकेज मिळवण्यासाठी युरोपियन महासंघाच्या अटी मान्य कराव्यात की, नाही हे ठरवण्यासाठी ग्रीसमध्ये रविवारी सार्वमत घेण्यात आलं. पण, ग्रीसमधल्या निकालाचा अर्थ काय ? निघतो हेही पाहण्याच ठरणार आहे. कारण सार्वमताचा निकाल युरोप विशेषत: जर्मनीविरोधात आहे. यामुळे ग्रीस आणि युरोपमधली दरी वाढेल. ग्रीसला सर्वाधिक कर्ज दिलेल्या जर्मनीला मोठा धक्का आहे. ग्रीस पुन्हा स्वत:चं ड्रॅक्मा हे चलन वापरात आणण्याची शक्यता आहे.

ग्रीसमध्ये बेलआऊट पॅकेजसाठी सार्वमत झालं. या सार्वमतात वयस्कर ग्रीक नागरिक बेलआऊटच्या बाजूने मत द्यायला उत्सुक असल्याचं दिसलं. याउलट ग्रीक तरुण मात्र या बेलआऊट पॅकेजबरोबर येणारे कडक आर्थिक बदलांबाबत नाखुष आहेत. ग्रीसने कर्ज न फेडल्यामुळे त्यांच्यावर आलेल्या आर्थिक निर्बंधांचा सर्वात जास्त फटका वयस्कर मंडळींना बसलाय. म्हणूनच ग्रीसने बेलआऊट स्वीकारावं आणि युरोपकडून आर्थिक मदत घ्यावी असं त्यांचं म्हणणं होतं. तर बेरोजगारीचा फटका बसलेली ग्रीक तरूणाई बेलआऊटच्या विरोधात आहे.

ग्रीसमधल्या निकालाचा अर्थ काय?

1) सार्वमताचा निकाल युरोप विशेषत: जर्मनीविरोधात आहे

2) यामुळे ग्रीस आणि युरोपमधली दरी वाढेल

3) ग्रीसला सर्वाधिक कर्ज दिलेल्या जर्मनीला मोठा धक्का

4) ग्रीस कदाचित युरोझोनमधून किंवा युरोपियन युुनियनमधूनच बाहेर पडेल

5) युरोपियन सेंट्रल बँकेनं पुरवठा बंद केल्यास ग्रीसमधल्या बँका कोलमडतील

6) ग्रीस युरोझोनमधून बाहेर पडला तर युरोपियन युनियनच्या स्वप्नाला पहिला मोठा धक्का बसेल

7) ग्रीस पुन्हा स्वत:चं ड्रॅक्मा हे चलन वापरात आणण्याची शक्यता

8) जागतिक बाजारपेठेत युरोची पत घसरण्याची शक्यता

9) ग्रीसमधल्या पर्यटन व्यवसायाला मोठा धक्का बसेल

10) ग्रीसमध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढेल

11) युरोपातल्या मंदीचा मोठा परिणाम जागतिक बाजारावर होईल

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 6, 2015 07:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close