S M L

वरुणराजे जुलैच्या दुसर्‍या पंधरवड्यात पुन्हा बरसणार !

Sachin Salve | Updated On: Jul 6, 2015 08:34 PM IST

वरुणराजे जुलैच्या दुसर्‍या पंधरवड्यात पुन्हा बरसणार !

06 जुलै : मान्सूनने जूनमध्ये मुंबईसह राज्यभरात दमदार हजेरी लावलीय. मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद झालीये. विदर्भ, चंद्रपूर, वर्ध्यातही पाऊस चांगलाच बरसला. पण, मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरवलीये. त्यात भरातभर म्हणजे जुलै महिना उघडला तरी पाऊस नसल्यामुळे बळीराजाचा जीव टांगणीला लागलाय. जुलैच्या पंधरवड्यात पाऊस परतणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय.

जूनमध्ये चांगला पाऊस झाला. पण त्यानंतर पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत आहे. पण दडी मारलेला पाऊस जुलैच्या दुसर्‍या पंधरवड्यात परतेल, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. तर पुढच्या आठवड्यात पाऊस सुरू होईल, असा अंदाज स्कायमेटनं व्यक्त केलाय. त्यामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात सरासरीच्या 10 टक्के कमी पाऊस पडलाय. त्यामुळे खरिपाची पिकं पावसाअभावी आत्ताच सुकू लागलीय. मान्सून वेळेत परतला नाहीतर शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं म्हणूनच स्कायमेटने मान्सुनच्या पुनरागमनाची दिलेली वार्ता बळीराजासाठी नक्कीच दिलासा देणारी आहे. मराठवाड्यात बीड, परभणी, जालना, उस्मानाबादेत जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. अक्षरश: शेतकर्‍यांना पाणी विकत घेऊन पिकं वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागले आहे. जुलैच्या पंधरवड्यात पाऊस परतणार असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केलाय. पण, तोपर्यंत पिकांना पाणी कसं पुरवायचं असा प्रश्न शेतर्‍यांना पडलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 6, 2015 08:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close