S M L

सीएसटीवरील हमालांच्या 'ओझ्या'चा सरकारला विसर

26 नोव्हेंबर सतत धावपळीत असणार्‍या मुंबईकरांची माणुसकी 26/11 च्या हल्ल्यात पुन्हा दिसून आली. सीएसटी स्टेशनवर अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. स्टेशनवर मृतदेहांचा खच पडला होता. अनेकजण जखमी अवस्थेत तडफडत होते. त्या सगळ्यांना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये पोचवण्याचं काम स्टेशनवरच्या हमालांनी केलं. आपल्या हातगाड्यांवर त्यांनी जखमी आणि मृतांना वाहून नेलं. पण सरकारनं त्यांची साधी दखलही घेतली नाही. सीएसटी स्टेशनवरचे हमालाची रोजीरोटी हातगाड्यांवर चालते. पण 26/11 च्या रात्री त्यांनी हातगाड्यांचा वापर लोकांचा जीव वाचवण्यासाठी केला. एका गाडीवर पाच सहा लोकांना टाकुन त्यांनी हॉस्पीटलमध्ये नेलं आणि परत परत येऊन ते जखमीना घेऊन जात होते. या हमालांनी सीएसटीवर मृत्युचं तांडव प्रत्यक्ष पाहिलं आहे. त्या काळरात्रीच्या आठवणीने अजूनही त्यांच्या अंगावर शहारा येतो. अनेकांचे प्राण वाचवणार्‍या या हमालांचं कार्य खूप मोठं आहे. पण सरकारला आणि रेल्वे प्रशासनाला मात्र त्यांचा विसर पडलेला दिसतोय. त्यांना पैशाची अपेक्षा नाही. त्यांना मानसन्मानही नकोय. अतिरेक्यांनी केलेल्या मृत्युच्या तांडवात काही लोकांचे प्राण वाचवले, याचाच त्यांना अभिमान आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2009 12:41 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2009 12:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close