S M L

मुंबईत 'लेप्टो'चे एका आठवड्यात 12 बळी

Sachin Salve | Updated On: Jul 7, 2015 08:56 PM IST

मुंबईत 'लेप्टो'चे एका आठवड्यात 12 बळी

07 जुलै : मुंबईत पाऊस पडला की भिती वाटू लागते ती पावसामुळे होणार्‍या आजारांची...मग तो डेंग्यू असो की मलेरीया..पण या वर्षी मात्र काळजी घ्यावी ती लेप्टोस्पायरोसीस होऊ नये म्हणून असा सल्ला मुंबई महापालिकेनं दिलाय. कारण, जुलैच्या पहिल्याच आठवड्यात लेप्टोनं मृत्यू झालेल्यांची संख्या 12 वर पोहचली आहे.

त्यापैकी 11 जण हे गोरेगाव ते दहिसर या भागातले आहेत, तर एक जण वरळी परिसरातला आहे. एका आठवड्यात 12 जणांच्या मृत्युमुळे पालिकेपुढे ही कोडं निर्माण झालंय. त्यामुळं लोकांनी पाऊस पडल्यानंतर तुंबलेल्या पाण्यात जाणं टाळावं असा सल्ला पालिकेनं दिलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 7, 2015 07:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close