S M L

नाचक्कीनंतर, गेल्या 10 वर्षांत रेट कॉन्ट्रॅक्टच्या खरेदीची होणार चौकशी

Sachin Salve | Updated On: Jul 7, 2015 09:16 PM IST

नाचक्कीनंतर, गेल्या 10 वर्षांत रेट कॉन्ट्रॅक्टच्या खरेदीची होणार चौकशी

07 जुलै : महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्यात 206 कोटींचा चिक्की घोटाळ्यानंतर फडणवीस सरकारने बचाव मोहिम हाती घेतलीये. आता रेट कॉन्ट्रॅक्टने गेल्या 10 वर्षांत केलेल्या खरेदीची चौकशी केली जाणार आहे अशी घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन केलीये. यासाठी चौकशी समितीची स्थापना करण्यात येणार आहे.

गेल्या दहा वर्षातील खरेदी, किती वस्तू आल्यात, किती पडून आहेत, नियमाचा भंग झालाय का या सर्वांची चौकशी समिती करणार आहे. अहवाल आल्यानंतर कारवाईचा निर्णय घेतला जाईल असंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. महिला आणि बालकल्याण खात्याच्या 206 कोटींच्या खरेदीवरून झालेल्या घोटाळ्यांच्या आरोपानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. चिक्की घोटाळ्यात रेट कॉन्ट्रॅक्टने खरेदी करण्यात आलीये. मागील आठवड्यात पंकजा मुंडेंनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. आणि आपण पक्षात एकाकी नाही असंही स्पष्ट केलं. पण, आता राज्य सरकारने बचाव म्हणून गेल्या दहा वर्षांतील रेट कॉन्ट्रॅक्टने खरेदीची चौकशी करण्याची घोषणा केलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 7, 2015 09:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close