S M L

दाऊदच्या 'घरवापसी'बाबत जेठमलानींच्या वक्तव्यावर विश्वास का ठेवायचा ?-पवार

Sachin Salve | Updated On: Jul 7, 2015 10:40 PM IST

Sharad Pawar on tobacco07 जुलै : शेकडो जणांचा बळी घेणार्‍या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे वकीलपत्र घेणार्‍या जेठमलानी यांच्या बोलण्यावर खरंच विश्वास ठेवायचा का ? याचा विचार करायला हवा त्यामुळे दाऊदला खरंच भारतात परतायचे होते की, नाही या चर्चेत अजिबातच तथ्य नाहीये असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलंय. दाऊदला जर खरंच परतायचे असते तर त्याने जेठमलानी यांच्याबरोबरच मुंबई पोलास आयुक्त किंवा राज्याच्या पोलीस महासंचालकांशी का संपर्क केला नाही असा सवालही पवार यांनी विचारलाय.

राम जेठमलानी यांनी दाऊद इब्राहिमला भारतात परतायचे होते पण राज्य सरकारने प्रस्तावाला उशीर केला होता. त्यामुळे दाऊद भारतात येऊशकला नाही असा गौप्यस्फोट केला होता. त्यावर पवारांनी तत्काळ खुलासाही केला होता. दाऊदने भारतात आल्यावर अटक करू नये, घरातच नजरकैद करावे अशा अटी घातल्या होत्या म्हणून प्रस्ताव फेटाळला होता असं स्पष्टीकरण पवारांनी दिलं होतं. आज पुन्हा एकदा शरद पवारांनी दाऊदच्या 'घरवापसी'चा चेंडू राम जेठमलानींच्या कोर्टात टोलवला असून राम जेठमलानींनी त्यावेळी मुंबई पोलास आयुक्त किंवा राज्याच्या पोलीस महासंचालकांशी का संपर्क केला असा सवाल पवारांनी उपस्थित केलाय. जर खरंच दाऊद भारतात परतणार होता तर जेठमलानींनी तसा प्रयत्न का केला नाही असा प्रश्न विचारला जातोय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 7, 2015 10:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close