S M L

...तर संपूर्ण विदर्भाचा ‘भंडारा-गोंदिया’ होईल- उद्धव ठाकरे

Samruddha Bhambure | Updated On: Jul 8, 2015 11:59 AM IST

...तर संपूर्ण विदर्भाचा ‘भंडारा-गोंदिया’ होईल- उद्धव ठाकरे

uddhav-fadanavis

08 जुलै : 15 जूनपर्यंत शेतकर्‍यांच्या नुकसानीचा पंचनामा करून त्यांच्या आधीच्या कर्जाचे पुनर्गठन होऊन त्यांना कर्ज मिळेल, असा मुख्यमंत्र्यांचा शब्द होता, पण मदत नाही, कर्ज नाही व चूलही पेटत नाही. अशा कोंडीत सापडलेल्या हजारभर शेतकर्‌यांनी वर्षभरात आत्महत्या केल्या असतील तर संपूर्ण विदर्भाचा 'भंडारा-गोंदिया' व्हायला वेळ लागणार नाही असं म्हणत शिवसेनेने आपल्या मुखपत्र 'सामना'तून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.

विदर्भातील खदखद भंडारा तसेच गोंदिया जिल्हा परिषदेच्या निकालातून बाहेर पडली हे सत्य स्वीकारले तर येणारा काळ कठीण आहे असे भाकीत आम्ही आजच करीत आहोत, असा रोखठोक इशारा शिवसेनेने मित्रपक्ष भाजपला दिला आहे. यानिमित्ताने शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा कोंडीत पकडले आहे.मुख्यमंत्री, मंत्री विदर्भाचे असूनही विदर्भात आनंदाचे क्षण येऊ शकत नाहीत, शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरूच आहेत, असं सामनात म्हटलं आहे.

भंडारा आणि गोंदियातील जनतेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला स्वीकारले, याचा कोणी काय घ्यायचा तो अर्थ घेऊ द्या, पण महाराष्ट्रासाठी हे लक्षण बरे नव्हे व हा शुभशकून नव्हे ही आमची खंत आहे. आजच्या राजवटीपेक्षा आधीचे लोक बरे होते या वैफल्यातून या दोन्ही ठिकाणचा निकाल लागला असेल तर महाराष्ट्राचे समाजमन ओळखून सरकारला पावले उचलावी लागतील. भंडारा तसंच गोंदियात पैशांचा पाऊस पाडला म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीने यश मिळवले ही सारवासारव आता करता येणार नाही, असंही अग्रलेखात म्हटलं आहे. भंडारा तसंच गोंदियात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत पैशांचा पाऊस पाडूनही राष्ट्रवादीचे श्रीमंत आणि तालेवार उमेदवार पडले होते. त्यामुळे फक्त पैशानेच सर्वकाही सदासर्वकाळ जिंकता येते हे सत्य नाही. भंडारा-गोंदियाचा निकाल हा निदान विदर्भाची जनभावना समजायला हवी, असे सांगत जागे व्हा, असा सल्ला दिला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 8, 2015 11:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close