S M L

भारताचा दणदणीत विजय

27 नोव्हेंबर कानपूर टेस्टमध्ये भारतीय टीमने श्रीलंकेचा दणदणीत पराभव करत सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या टेस्टमध्ये पहिल्या दिवसापासूनच भारतीय टीमचं वर्चस्व होतं. बॅटिंग तसंच बॉलिंगमध्येही भारतीय टीम उजवी ठरली. टेस्टच्या चौथ्या दिवशीच श्रीलंकन टीमला एक इनिंग आणि 144 रन्सनी हरवलं. पहिल्या इनिंग प्रमाणेच दुसर्‍या इनिंगमध्येही श्रीलंकेची बॅटिंग फ्लॉप ठरली. श्रीलंकेची टीम 269 रन्सवर ऑलआऊट झाली. या मॅचमध्ये तीन भारतीय बॅट्समननी सेंच्युरी केली. तर श्रीसंतने यशस्वी कमबॅक करत पहिल्या इनिंगमध्ये पाच विकेट्स घेतल्या.शंभरावा टेस्ट विजय कानपूर टेस्टमधला विजय भारतीय टीमसाठी आणखी एका दृष्टीने महत्त्वाचा होता. कारण टेस्ट क्रिकेट मधला भारतीय टीमचा हा शंभरावा विजय होता. भारताने 1932 साली आपली पहिली टेस्ट खेळली मॅच खेळली होती. पण, पहिल्या विजयासाठी टीमला तब्बल वीस वर्षं वाट पहावी लागली. 1951-52मध्ये चेन्नई टेस्टमध्ये इंग्लंड विरुद्ध मिळवलेला विजय हा भारतीय टीमचा पहिला टेस्ट विजय होता. त्यानंतर खेळलेल्या 432 टेस्टमध्ये भारताने 100 टेस्ट जिंकल्या. तर 136 मॅचमध्ये टीमला पराभव पत्करावा लागला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 27, 2009 12:57 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 27, 2009 12:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close